Main course लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Main course लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १८ जानेवारी, २०१२

Akhkha Masur - अख्खा मसुर

जिन्नस:
मसुर - एक ते दिड वाटी (साधारण २०० ग्रॅम)
कांदे - २ मध्यम आकाराचे
टोमॅटो - २
लसुण - १० / १२ पाकळ्या
गरम मसाला - १ चमचा (टेबल्स्पुन)
लाल तिखट - १ चमचा (टेबल्स्पुन)
कश्मिरी लाल तिखट - १/२ चमचा (जास्त झाले तरी चवीत फारसा फरक पडत नाही कारण हे फार तिखट नसतेच)
मीठ - चवीप्रमाणे
जीरे - फोडणीसाठी
तेल
कोथींबीर


पाककृती:
मसुर ३ ते ४ तास साधारण कोमट पाण्यात भिजत ठेवावी. (यामुळे शिजण्याचा वेळ वाचतो.)
कांदा, टोमॅटो, बारीक चिरुन घ्या.
लसुन ठेचुन घ्या.
कढईत तेल तापवुन त्यात जीरे, लसुन आणि कांदा घाला.
कांदा शिजेपर्यंत मध्यम आचेवर परतुन घ्या.
मग त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घाला.
टोमॅटो शिजत आला की मसुर घाला व नीट परतुन घ्या.
नंतर लाल तिखट, कश्मिरी तिखट, गरम मसाला, मीठ आणि बारीक चिरलेली कोथींबीर घाला.
तीन वाटी पाणी (मसुरच्या दुप्पट) घालुन मसुर शिजायला ठेवुन द्या.
मसुर शिजल्यावर सर्विंग बोल स्मित  मधे काढुन कोथींबीर (आणि असल्यास क्रीम) ने सजवा.

वाढणी/प्रमाण:
चार ते पाच जणांसाठी
अधिक टिपा:
आवडत असल्यास यात मसुर शिजवताना १ चमचा दही पण घालु शकतो, पण टोमॅटोचा आंबटपणा असल्याने जास्त दही नको.
माहितीचा स्रोत:
सासुबाई