गुरुवार, १० नोव्हेंबर, २०११

Shevai Kheer - शेवई खीर


जिन्नस:
शेवई- १/४ कप
दुध - १ लिटर
तूप - १ चमचा
साखर - १/४ कप
वेलदोडा पूड - १/४ चमचा
केसर - १५ - २० काड्या
बदाम - ८ ते १०
पिस्ता - ८ ते १०

पाककृती:
बदाम थोडा वेळ कोमात पाण्यात भिजत घालून, साल काढून पातळ काप करून घ्यावेत.
तसेच पिस्त्याचेही पातळ काप करून घ्यावेत.
२ चमचे दुधात केसर चुरून घालावे.
एका जाड खोलगट भांड्यात तूप गरम करावे.
त्यात शेवई टाकून छान सोनेरी संगावर भाजुन घेउन त्यात दुध टाकुन उकळावे.
मग साखर टाकुन परत एक उकळी आणायची.
हव तस वेलदोडा पूड, केसर, बदाम आणि पिस्ता टाकुन चव आणि स्वाद वाढवावा.
हि झाली खीर तय्यार...

वाढणी/प्रमाण:
३ ते ४ जणांसाठी

माहितीचा स्रोत:
माझी आई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा